spot_img
ब्रेकिंगचुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

चुलत्याच्या कृपेनं बरं चाललंय, अजितदादादांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, काय म्हणाले पहा

spot_img

बीड / नगर सह्याद्री –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बीड दौऱ्यावर असणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवारांचे कौतुक केलेच, पण चुलत्याच्या कृपेमुळे बरे चाललेय, असे वक्तव्य केले, त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर शरद पवार यांनी विरोधातच राहण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना दिले होते. त्यानंतर बारामतीमधून पवार कुटुंबातच लढत झाली होती. लोकसभेला शरद पवार यांनी बाजी मारली होती, तर विधानसभेला अजित पवार यांनी हिशोब चुकता केला होता.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीगाठीवरून काका-पुतणे एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता अजित पवार यांनी बीडमध्ये केलेल्या वक्तव्याने नव्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
आई-बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने सर्व बरं चाललं आहे. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या.माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा.. पायाही पडू नका. मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता, त्याचा इतिहास आठवा अन् म्हणा मी कुणाच्या पाया पडलो. आई-बाप, गुरूच्या पाया पडा.

बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार
जिल्ह्यात मागच्या तुलनेत कामाचा स्पीड वाढलेला आहे. पण रस्ते मंजूर करून नुसती बिलं काढेल त्याला मी नाही मातीत घातला तर बोला, असा दम बीड जिल्ह्यातील ठेकेदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना अजित पवारांनी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर भाष्य करताना सगळ्यानाच चांगला दम भरला आहे. त्यामुळे दादांच्या दादागिरीचा रोख नेमका कोणाकडे होता? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात राख, वाळू, भूमाफिया अशा गँग वाढल्या आहेत. पण या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करायचं आहे. त्याला आता पर्याय नाही. बीड जिल्ह्यात विविध विकासकामांना मी निधी देणार आहे. पण स्कॉड पाठवून या कामांची पाहणी सुद्धा करण्यात येणार आहे. चुकीचं काम करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल, असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डुप्लिकेट चावीची कमाल, चार लाख छूमंतरल; नगरमध्ये घडलं असं काही..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून आत प्रवेश करत 11 तोळे आठ...

अवकाळीचा तडाखा!; पारनेर, संगमनेर, कर्जत, अकोले, पाथडत पाऊस

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पारनेर, संगमनेर,...

‘मर्चंट्स बँकेस सात कोटी तीन लाखांचा निव्वळ नफा’

अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांची माहिती; 26 कोटी 87 लाखांचा रिबेट देऊनही बँकेस 39 कोटींवर...

श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये ‌‘पुष्पाराज‌’!; नागरिक वेटिंगवर, प्रशासक सेटिंगवर

श्रीगोंदा | नगर सह्याद्री श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये नागरिकांच्या हिताचे कामे होत नसून फक्त स्वहिताचे काम होत...