spot_img
अहमदनगरसीना नदीच्या पुराच्या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला; कुठे साधला डाव.., वाचा अहिल्यानगर...

सीना नदीच्या पुराच्या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला; कुठे साधला डाव.., वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील कल्याण रोड परिसरात मुसळधार पावसामुळे सीना नदीला आलेल्या पुराचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका चार मजली अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घुसून तब्बल ७८ हजार रुपयांच्या इलेक्ट्रिक वायरची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, चोरट्यांनी वायरसोबतच घरातील पीओपीचेही मोठे नुकसान केल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी नंदिनी भरत भोज (वय ५९, रा. दातरंगे मळा, नेप्ती चौक) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे अनुसयानगर, शिंदेमळा येथील जाधव पेट्रोल पंपाच्या मागे एक चार मजली घराचे बांधकाम सुरू आहे. २७ सप्टेंबर रोजी त्यांनी घराला कुलूप लावले, मात्र त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी सीना नदीला पूर आल्याने त्या बांधकाम स्थळी जाऊ शकल्या नाहीत.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्या जेव्हा बांधकामाच्या ठिकाणी पोहोचल्या, तेव्हा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. आतमध्ये पाहणी केली असता, भिंतीतून वायर कापून नेण्यात आलेली होती, तसेच पार्किंगमधील स्टोअरमध्ये ठेवलेले नवीन वायरचे बंडलही चोरीला गेले होते. चोरट्यांनी वायर ओढताना पीओपीच्या कामाचे मोठे नुकसान केल्याचेही निदर्शनास आले.चोरीस गेलेल्या मालामध्ये पॉलीकॅब कंपनीच्या विविध साईजच्या वायरचा समावेश आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

केडगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट; शेततळ्यातील दोन पाणबुड्या मोटारी लंपास
केडगाव बायपास नेप्ती रोड परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले हात साफ करत कांदा मार्केट समोरील शेततळ्यातून तब्बल २४ हजार रुपये किमतीच्या दोन पाणबुडी मोटारी व स्टार्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी सचिन किसन पवार (वय ३४, रा. केडगाव, अंबिका नगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पवार यांचा विटभट्टीचा व्यवसाय असून, त्यांची शेती कांदा मार्केटजवळ आहे. शेती व वीटभट्टीच्या कामासाठी त्यांनी शेततळ्यात दोन पाणबुडी मोटारी बसवल्या होत्या. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे विटभट्टीवर गेले असता, शेततळ्यात मोटारी दिसेनात. त्यांनी जवळून पाहणी केली असता, मोटारींना जोडलेल्या वायरी तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्या. चोरट्यांनी अत्यंत शिताफीने ५ एचपी आणि ३ एचपी क्षमतेच्या ‘लिव्हा’ कंपनीच्या दोन मोटारी व स्टार्टर चोरून नेल्याचे स्पष्ट झाले, या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत.

दुकानदार दांपत्याची महिलेला मारहाण
धान्य खरेदीच्या वेळी काही रक्कम कमी दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दुकानदार दांपत्याची एका महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना जे. जे. गल्ली परिसरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पती-पत्नीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राणी इरफान बागवान (वय ३४, रा. घासगल्ली) या रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास विशाल धान्य दुकानात पाच किलो धान्य खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी पैसे देताना काही रक्कम कमी दिली गेली, याचा राग येऊन दुकानदार प्रशांत पांडुरंग सिद्ध याने बागवान यांना, एखादा किलो धान्य जास्त घेऊन जा, पण पैसे कमी देऊ नका अशा शब्दांत सुनावले. या क्षुल्लक वादाचे पर्यवसान वादात होऊन दुकानदाराने राणी बागवान यांना शिवीगाळ व चापटीने मारहाण केली. दरम्यान, दुकानात उपस्थित असलेल्या त्याच्या पत्नीने देखील बागवान यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या बागवान यांनी तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, प्रशांत सिद्ध व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील; मंत्री राधाकृष्ण विखेंविरुद्धचा ‘तो’ खटला मागे

मुंबई | नगर सह्याद्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि...

ऑक्टोबरमध्येही पाऊस झोडपणार; अहिल्यानगरला ‘ईतक्या’ दिवसांचा अलर्ट

पुणे | नगर सह्याद्री गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीने दाणादाण उडाली आहे. विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे...

अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा! राज्य सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यातील बहुतांश जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात...

खासदार ओवैसींची सभा रद्द; माजी खासदार इम्तियाज जलील यांची माहिती, कधी होणार सभा?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरात आज एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची...