विजय ज्वेलर्स दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न
भाळवणी | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विजयकुमार कुलथे यांचे सोन्याचे ’विजय ज्वेलर्स’ हे दुकान गुरुवारी मध्यरात्री साडेतीन च्या सुमारास १० ते १२ जणांच्या टोळयाने फोडण्याचा प्रयत्न केला.
याठिकाणी सुरक्षा रक्षक असलेल्या चेतन बोरसे याचे हात व तोंड बांधून डोयात पिशवी घालून शेजारी असलेल्या नागेश्वर हॉटेलच्या बोळीत टाकून दिले. शेजारील लोक आवाजाने जागे झाल्याने चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाचा मोबाईल, हेल्मेट, ट्रॅकसुट, काठी व इतर साहित्य घेऊन तेथून पळ काढला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
यावेळी चोरट्यांनी दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. यामुळे बाजारपेठेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करत आहेत.