spot_img
अहमदनगरसीसीटीव्हीत चोरटा कैद?; मार्केटयार्ड परिसरात घडली 'तसली' घटना..

सीसीटीव्हीत चोरटा कैद?; मार्केटयार्ड परिसरात घडली ‘तसली’ घटना..

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यागर शहरातील मार्केटयार्ड परिसरातील जंगदंबा कृषी सेवा केंद्रातून अज्ञात व्यक्तीने 37 हजार 500 रुपये किमतीचे कांद्याच्या बियाण्यांचे सिलबंद बॉक्स चोरल्याची घटना मंगळवारी (दि. 17 जून 2025) सायंकाळी 7:03 वाजता घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सागर श्रीप्रकाश तिपुळे (वय 32, रा. संदीपनगर, सारसनगर, अहिल्यागर) यांनी सांगितले की, त्यांच्या गोडाऊनमधून अर्धा किलो वजनाच्या 30 पिशव्या असलेले येलोरा कंपनीचे कांद्याचे बियाणे अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या हेतूने चोरले. चोरट्याने हिरवट रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट परिधान केली होती, असे फिर्यादीत नमूद आहे.

चोरीची घटना घडल्यानंतर फिर्यादीने रात्री 11:33 वाजता कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला असून, पोलीस हवालदार संदीप रंगनाथ पितळे यांना तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...