spot_img
ब्रेकिंग..'ते' प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार; माजी मंत्री कर्डिले

..’ते’ प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार; माजी मंत्री कर्डिले

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

अंगणवाडी सेविका महागाईच्या काळात १० हजारांत काम करत आहेत. त्या लहान बालकांना घडवतात. ज्ञानदानाच्या कामासोबतच शासनाच्या विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारीही त्या पार पाडत असतात. त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करू, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.

अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर असून त्यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागणीचे निवेदन देत १० डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार असल्याचा इशारा दिला. यावेळी भाजपचे युवा अक्षय कर्डीले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सुमन सप्रे, स्मिता औटी यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी, बालवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी उपस्थित होते,

निवेदनात म्हटले आहे की, विविध मागन्या मान्य न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी, युनियन आयटक व कृती समितीद्वारे ४ डिसेंबर २०२३ पासून अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतीस कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. अध्यक्ष सुमन सप्रे यांनी माहिती दिली की जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी हे नोव्हेंबर २०२३ चा महिन्याचा मासिक अहवाल ( एम पी आर), मासिक बैठका, इतर माहिती व कामे करणार नसून सर्व कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. संघटनेच्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील ४ हजारांच्यावर तर महाराष्ट्रातील १ लाख अंगणवाडी कर्मचारी संपात सहभागी होतील.

काय आहेत मागण्या ?

– सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युईटीबाबत दिलेल्या अंतिम निकालाची अंमलबजाणी करणे
– अंगणवाडी सेविका व मिनी सेविकांना दरमहा २६ हजार तर मदतनिसांना २० हजार रुपये मानधन
– महागाई निर्देशांकाला जोडून दर ६ महिन्यांनी मानधनात वाढ करणे
– विना योगदान मासिक निर्वाह भता (पेन्शन) सेवा समाप्तीनंतर देण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजूर करणे
– आहाराचा दर सर्वसाधारण १६ व अतिकुपोषित बालकांसाठी २४ रुपये करणे

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...