spot_img
अहमदनगर'त्यांनी' कंटेनरला दुचाक्या आडव्या लावल्या अन्..; नगर-पुणे महामार्गावर धक्कादायक प्रकार

‘त्यांनी’ कंटेनरला दुचाक्या आडव्या लावल्या अन्..; नगर-पुणे महामार्गावर धक्कादायक प्रकार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
रात्रीच्या वेळी वाहन चालकाला रस्त्यात अडवून मारहाण करत लुटल्याची घटना अहिल्यानगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर बुधवारी (19 मार्च) रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी केडगाव येथील तीन संशयितांना पहाटेच्या सुमारास पकडले. यात दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. याबाबत तोफिक शरीफ अन्सारी (वय 29, रा. झारखंड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे बुधवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील कंटेनर घेवून पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेने येत असताना चास शिवारात दोन दुचाकीवरून तीन अनोळखी तरूण आले. त्यांनी भारत पेट्रोल पंपासमोर कंटेनरला दुचाक्या आडव्या लावून कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबविण्यास भाग पाडले. त्यानंतर तिघांनी चालक अन्सारी यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत अन्सारी यांच्याकडील सात हजारांची रोकड तसेच कागदपत्रे असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत तेथून पळून गेले.

जाताना त्यांनी कंटेनरच्या काचांवर दगड फेकून मारत त्या फोडून नुकसान केले. या घटनेनंतर कंटेनर चालक अन्सारी यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांच्या मदतीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधून लुटमारीची माहिती दिली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला. सदरचा गुन्हा केडगाव येथील तिघांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्यांनी केडगावच्या एकनाथनगर येथील सनी धोत्रे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; कुठे घडली घटना?

संगमनेर । नगर सहयाद्री:- शेतातील बागेत डाळिंब तोडणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. ही घटना...

अहिल्यानगर: वेटरने घेतला हॉटेलमध्ये गळफास; कारण आलं समोर..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- पती-पत्नीचा किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पत्नी रागाच्या भरात घरातून बाहेर निघून...

आजचे राशी भविष्य! चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. जर तुमची...

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...