spot_img
ब्रेकिंगAhmadnagar Politics: श्रेयासाठी 'ते' खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच 'तो'...

Ahmadnagar Politics: श्रेयासाठी ‘ते’ खोट्या बातम्या देता!! आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यानेच ‘तो’ पूल

spot_img

‘यांनी’ साधला विरोधकांवर निशाणा

संगमनेर। नगर सहयाद्री-

शहरातील महत्त्वपूर्ण असलेल्या म्हाळुंगी नदीवरील पुलासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांच्याच प्रयत्नातून या पुलाचे काम सुरू होत आहे. मात्र ज्यांनी श्रेयासाठी पूलाचा निधी अडवण्याचा प्रयत्न केला ती मंडळी आता खोट्या बातम्या देऊन श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत असल्याची टीका शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील प्रत्येक विकास कामासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनीच पाठपुरावा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन द्वारे 24 तास मिळणारे पाणी, नुकताच झालेला हॅपी हायवे यासह अनेक मोठमोठी विकास कामे राज्यासाठी दिशादर्शक ठरत आहेत.

2022 मध्ये आलेल्या पुरामुळे म्हळुंगी नदीवरील पूल खाचला होता. त्यामुळे नागरिकांची जाण्या- येण्यासाठी गैरसोय झाली होती. यामुळे या पुलाचे काम तात्काळ व्हावे याकरता आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन या कामासाठी शाळेत निधी मिळावा अशी मागणी केली होती.

सर्व पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या कामाला साडेचार कोटींचा निधी दिला. मात्र हा निधी मिळू नये या कामी स्थानिक भाजपाने सत्ताधाऱ्यांनी मार्फत आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला हे सर्वश्रुत आहे.

आता पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने हीच मंडळी श्रेयासाठी सरसावली आहे. त्यांनी एक तरी चांगले काम केले का ? याचे उदाहरण जनतेला दाखवले पाहिजे त्यामुळे त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांना जनता कधी बळी पडणार नाही असेही निखिल पापडेजा यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...