spot_img
ब्रेकिंग...'ते' वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

…’ते’ वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

spot_img

Manoj Jarange Patil: चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात आहे. ओबीसी नेता कोण आहेत. त्यांना आम्ही कधी टार्गेट केले नाही. मी त्यांचे नाव तोंडावर घेतले नाही. धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देणार आणि आम्ही गुंडाना बोलायचे नाही का? त्यांना लोकं कापू द्यायचे का? मी कोणत्या जातीचे नाव घेतले का? असा संतप्त सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात आहेत. त्यांनी माणूसकीची हत्या करण्याचे काम करू नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. मुलीच्या न्यायासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

धनंजय मुंडेंनी काय करावे काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना हे कळत नाही की एका लेकीने आपला वडील, एका भावाने आपला भाऊ गमावला आहे. धनंजय मुंडे आणि त्यांच्या टोळीने आरोपीला साथ देऊ नये. नाही. मुंडेंनी कुणाला वाचवू नये, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीला धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का...

कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम लागला; आमदार संग्राम जगताप यांनी घेतला विरोधकांचा समाचार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही....

राज्यात पुन्हा वाढणार हुडहुडी! येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | नगर सह्याद्री:- उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत...

‘अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतिदिनाचेे पंतप्रधान मोदी यांना सभापती प्रा. शिंदे यांचे निमंत्रण’

जामखेड । नगर सहयाद्री:- विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी कुटुंबासह पंतप्रधान...