spot_img
ब्रेकिंग'लाडकी बहीण' योजनेचा जूनचा हप्ता 'या' महिलांना मिळणार नाही; नवी अपडेट समोर

‘लाडकी बहीण’ योजनेचा जूनचा हप्ता ‘या’ महिलांना मिळणार नाही; नवी अपडेट समोर

spot_img

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचा जून महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मात्र, अनेक महिलांना यंदा जूनचा हप्ता मिळणार नसल्याचे समोर आले आहे.सरकारने योजनेसाठी काही ठोस निकष निश्चित केले आहेत. हे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच लाभ दिला जातो.

पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत: महिलांचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी नसाव्यात. लाभार्थी महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.महिलांकडे चारचाकी वाहन नसावे. योजनेच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने लाभार्थ्यांची नव्याने पडताळणी सुरू केली आहे. तपासणीत अनेक महिलांनी खोट्या माहितीतून अर्ज भरल्याचे समोर आले असून, अशा अर्जदारांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने अद्याप जून महिन्याच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, मात्र ही रक्कम लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर महिलांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासावी आणि शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच पुढील माहितीची खातरजमा करावी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शिर्डीतील गुटख्याच्या अड्ड्यावर एलसीबीचा छापा; मुद्देमालासह आरोपी गजाआड

शिर्डी । नगर सहयाद्री जिल्ह्यात गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्रीसारख्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक...

ICCचा नवा फॉर्म्युला, टेस्ट क्रिकेटमध्ये होणार ऐतिहासिक बदल, टीम इंडिया मात्र…

ICC Ready for 4 Day Test Cricket News : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आल्यापासून...

स्वबळावर की महायुती याचा निर्णय आमदार घेणार?; भाजप जिल्हाध्यक्षांची पत्रकार परिषदेत माहिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा निवडून...

मुळा-भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मान्सून दाखल!

अकोले | नगर सह्याद्री मुळा-भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून दाखल झाला. आज, सोमवारी...