spot_img
महाराष्ट्र'या' लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

‘या’ लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ताला लागणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

spot_img

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या पैशांकडे महिलांचे लक्ष आहे. या योजनेत काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचसोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचे आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न हे २.५ लाखांपेक्षा कमी असावे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचसोबत पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी. जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असेल तर कोणत्याही एका योजनेचा लाभ तिला घ्यावा लागणार आहे. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेतल असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी मंत्री थोरातांनी धाडलं थेट मंत्री विखे पाटलांना पत्र, कारण की…!

संगमनेर । नगर सहयाद्री:- भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मे-जून महिन्यांपासून समाधानकारक...

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....