spot_img
देशमनू भाकर, डी गुकेश यांच्यासह ‘या’ 4 खेळाडूंना मिळणार खेलरत्न पुरस्कार

मनू भाकर, डी गुकेश यांच्यासह ‘या’ 4 खेळाडूंना मिळणार खेलरत्न पुरस्कार

spot_img

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
Khel Ratna Award: भारत सरकारने क्रीडा जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या चार खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. डी गुकेश, मनू भाकर, हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना देशातील खेळातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासह एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरची कामगिरी उत्कृष्ट राहिली, तिने दोन पदके जिंकली. त्याचवेळी गुकेश नुकताच बुद्धिबळाच्या खेळात जगज्जेता झाला होता. गुकेश हा वर्ल्ड चॅम्पियन बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

चार खेळाडूंना खेलरत्न मिळणार –

यावेळी चार खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशाला गौरव मिळवून देणाऱ्या मनू भाकरला खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मनूने नेमबाजी खेळात भारतासाठी दोन पदके जिंकली होती. मनूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला होता. त्याचबरोबर वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी बुद्धिबळाच्या खेळात विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी गुकेशलाही देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गुकेशने गतविजेत्या डिंग लिरेन यांचा पराभव करून मोठी कामगिरी केली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत सिंग यांनाही खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हरमनप्रीतने या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक गोल केले.

17 जानेवारीला सन्मानित करण्यात येणार –
डी गुकेश, मनू भाकर, प्रवीण कुमार, हरमनप्रीत सिंग यांना 17 जानेवारीला राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या चार खेळाडूंना राष्ट्रपतींकडून देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणार आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी एकाही क्रिकेटपटूला खेलरत्न पुरस्कार मिळणार नाही. गेल्या वर्षी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. यावेळी एकूण 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे.

कोकोणाला पुरस्कार जाहीर झाले?
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024
गुकेश डी (बुद्धिबळ)
हरमनप्रीत सिंह (हॉकी)
प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स)
मनु भाकर (शूटिंग)

अर्जुन पुरस्कार
ज्योती येराजी (ऍथलेटिक्स)
अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
नितू (बॉक्सिंग)
सविती (बॉक्सिंग)
वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
सलीमा टेटे (हॉकी)
अभिषेक (हॉकी)
संजय (हॉकी)
जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
सुखजीत सिंह (हॉकी)
राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
कपिल परमार (पॅरा-जुडो)
मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
सरबज्योत सिंह (शूटिंग)
अभय सिंह (स्क्वॅश)
साजन प्रकाश (स्विमिंग)
अमन (कुस्ती)

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)
सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
दीपाली देशपांडे (शूटिंग)
संदीप सांगवान (हॉकी)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर तालुका मविआला अखेरची घरघर!; अनेकांचा कर्डिलेंशी घरोबा…

लंकेंच्या पराभवामुळे तालुक्यातील पुढार्‍यांनी साधली आमदार कर्डिलेंशी जवळीक सुनील चोभे | नगर सह्याद्री पंधरा...

राऊत साहेब, नगरमधील शिवसेना संपविल्याबद्दल अभिनंदन!; नगरमध्ये राठोडांचा विक्रम अन् गाडेंचा योगी…

सहकार पंढरीच्या जिल्ह्यातील शिवसेना संपली नव्हे संपवली | निवडणुका आल्या की बाळासाहेबांचे सैनिक लढणारे,...

…तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले पहा

बीड / नगर सह्याद्री - Manoj Jarange Patil on Dhananjay Munde: मस्साजोग गावचे सरपंच...

पालमंत्रीपदावरून रस्सीखेच; विखेंच ठरलं, अशी आहे संभाव्य पालमंत्र्यांची नाव

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याविषयी मोठ्या...