spot_img
ब्रेकिंगराज्यात तीन उपमुख्यमंत्री होणार! मी नक्की..: 'बड्या' नेत्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यात तीन उपमुख्यमंत्री होणार! मी नक्की..: ‘बड्या’ नेत्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

spot_img

Politics News: कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघातून कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (28 ऑक्टोबर) विराट शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. कागलच्या रणांगणामध्ये यंदा तुल्यबळ लढत होत आहे. हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी थेट भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनाच गळाला लावत मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवलं आहे. त्यामुळे कागलची लढाई टोकाला जाऊन पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज हसन मुश्रीफ यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

मला एक लाखाचं मताधिक्य आवश्यक आहे. हाडाची काडं करा, पै पाहुण्यांच्या भेटीगाठी घ्या, मात्र गाफील राहू नका. आपण गाफील राहिलो तर घरात जास्त उंदीर फिरतात असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांनी सभेला संबोधित केलं. महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा करत मी मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो असे ते म्हणाले.

आपण आजपर्यंत इतकं वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आहे की देशांमधील कोणत्याही नेत्यानं एवढं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम केलं नसल्याचे ते म्हणाले. मुश्रीफ पुढे म्हणाले की आतापर्यंत राजकारणात मी इतकी गर्दी पाहिली नव्हती. जवळपास एक लाख लोक या शक्तीप्रदर्शनाला उपस्थित आहेत. पुन्हा संधी दिल्यास मी तुमचा हमाल म्हणून काम करेन असेही ते म्हणाले.

25 वर्षे मला प्रतिनिधित्व करण्यास संधी दिली. तुम मुझे 18 दिन दे दो, मै तुम्हे दिल दूंगा असेही ते म्हणाले. मी पुन्हा निवडून आल्यास मुख्यमंत्री नाही पण उपमुख्यमंत्री नक्की होऊ शकतो. मी अल्पसंख्याक असल्याने मला चांगली मला संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. इतर राज्यांमध्ये तीन-तीन उपमुख्यमंत्री होतात तर आपल्या राज्यात का होऊ शकत नाही? अशी सुद्धा विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, इतकं सगळं मला मिळणार असेल तर जो ग्रामपंचायत सदस्य झाला नाही त्याला मत देऊन वाया घालवू नका.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...