spot_img
महाराष्ट्रराज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण...

राज्यात सत्तांतर होणार; शरद पवार यांनी सांगितले खरे कारण…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
लोकसभा निवडणुकीत पक्षफोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही स्थितीवर सत्तेवर येऊ देणार नाही. मी राज्यभर दौरे केले असून राज्यात सत्तांतर होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि महिलांवरील अत्याचार रोखण्यास अपयशी ठरलेल्या भाजपला खड्या सारखे बाजूला करा, सत्ताधारी पक्षांवर असे टीकास्त्र सोडून आपल्या विचारांच्या महाविकास आघाडी सरकारला विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी खासदार वंदना चव्हाण, प्रभारी शहर अध्यक्ष अंकुश काकडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, रवींद्र माळवदकर, संजय मोरे, प्रवीण तुपे, समीर तुपे, नीलेश मगर, योगेश ससाणे, दिलीप तुपे, मोहसीन शेख, सुभाष वारे, रत्नप्रभा जगताप, विजय देशमुख, बंडूतात्या गायकवाड, अनिल तुपे, नमेश बाबर, सक्षणा सलगर, प्राची आल्हाट, कुमार तुपे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हटले की, लोकसभेत देशभर पंतप्रधान 400 जागा निवडून द्या अशी मागणी करत होते. पन्नास टक्के जागा निवडून आल्या की सरकार स्थापन होते. पण भाजपला 400 जागा कशासाठी हव्या होत्या? असा प्रश्न पडला होता. त्यावेळी आम्ही खोलात गेलो, मग कळले संविधान बदलायचे आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

“राज्यामध्ये २०१९ मध्ये त्या पावसाच्या सभेनंतर फक्त पवार साहेबांचा चेहरा पाहून लोकांनी आत्ताच्या आमदारांना निवडून दिले. पण, सव्वा वर्षांपूर्वी त्याच पवार साहेबांना सोडून जाण्याचे पाप त्या आमदारांनी केले, त्यामुळे तुम्ही ठरवायचंय की या मतदारसंघात गद्दारी करणाऱ्या आमदाराला निवडून द्यायचे की संघर्ष करणाऱ्या साहेबांना साथ द्यायची.” – प्रशांत जगताप, उमेदवार, महाविकास आघाडी.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अज्ञात वाहनाने बाप-लेकाला उडवले! ‘या’ रोडवर भीषण अपघात..

पाथर्डी | नगर सहयाद्री पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरणच्या गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता मॉर्निंग...

१५०० रुपये कायमचे बंद? लाडकी बहीण योजनेतील १० लाख महिलांचे अर्ज बाद! यादीत तुमचेही नाव नाही ना?

मुंबई | नगर सहयाद्री राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! ठाकरे गटाच्या ‘बड्या’ नेत्याला अटक, कार्यालयातच केला महिलेवर अत्याचार..

संपर्क कार्यालयातच महिलेवर अत्याचार; शहरप्रमुख किरण काळे यांना अटक अहिल्यानगर | नगर सहयाद्री:- अहिल्यानगरमधून एक खळबळजनक...

आजचे राशी भविष्य! आषाढ महिन्यातील मंगळवार ‘या’ राशींना ठरणार लाभदायक

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह...