spot_img
ब्रेकिंगखळबळजनक! ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण’; कुठे घडला प्रकार?

खळबळजनक! ठाकरे-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण’; कुठे घडला प्रकार?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात काल रात्री शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार वादावादी आणि हाणामारी झाली. एकमेकांवर केलेल्या आक्षेपार्ह सोशल मीडिया टिप्पण्यांवरून हा वाद पेटला होता. या वादाचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये दोन्ही गटात झालेली शिवीगाळ आणि हातघाई स्पष्ट दिसून येते.

त्रिभाषा सूत्र रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे गट आणि मनसेकडून आनंद साजरा केला जात होता. याचवेळी वर्सोव्यात दोन्ही गटात तणावाची स्थिती निर्माण झाली. वादाचा केंद्रबिंदू ठरला शिवसेनेच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर केलेला छत्री वाटपाचा लाईव्ह कार्यक्रम.या कार्यक्रमावर शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाने अभद्र टिप्पणी केली होती, ज्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर जोगेश्वरीतील ‘रुची बार अ‍ॅंड रेस्टॉरंट’ बाहेर दोन्ही गट आमनेसामने आले आणि तिथे शाब्दिक बाचाबाची हाणामारीत बदलली.

व्हिडिओ फुटेजनुसार, या हाणामारीत काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना ढकलणे, शिवीगाळ करणे आणि हात उचलण्यापर्यंत मजल मारली. सुदैवाने ही झुंबड फारशी मोठ्या हिंसाचारात बदलली नाही.या घटनेनंतर संबंधित शाखाप्रमुखांनी माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तात्पुरती परिस्थिती शांत झाली असली तरी, मुंबईतील स्थानिक राजकारणात तणाव वाढलेला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरचे माफिया राज रोखण्यासाठी निवडणूकीत महायुतीला पाठबळ द्या : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निघोज / प्रतिनिधी रेडबुलचा वापर करुण पारनेरचा माफियाराज माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दादागीरीला सामोरे जावे लागत...

अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

कोल्हापूर / नगर सह्याद्री : राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले...

निवडणुकीची रणधुमाळी! उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात; आघाडी-युतीचे तळ्यात मळ्यात

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली  अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला...

अरणगाव शिवारात दोन गटात राडा; लोखंडी गज, काठीने मारहाण, वाचा प्रकरण?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर तालुक्यातील अरणगाव शिवारातील शिंदे मळा परिसरात दोन गटात शेतीच्या...