spot_img
अहमदनगरमोठा आवाज आला, नागरिक विहिरीजवळ गेले, समोरचं दृश्य पाहून अख्खं गावं हादरलं…

मोठा आवाज आला, नागरिक विहिरीजवळ गेले, समोरचं दृश्य पाहून अख्खं गावं हादरलं…

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड नगरपरिषद हद्दीतील, जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण चाकी बोलेरो गाडीने जामखेड कडे येत असताना जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत बोलेरो गाडी पडली. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.

जामखेड येथील अशोक विठ्ठल शेळके वय 29 रा. जांबवाडी, रामहरी गंगाधर शेळके वय 35 रा. जांबवाडी, किशोर मोहन पवार वय 30 रा. जांबवाडी, चक्रपाणी सुनील बारस्कर वय वय 25 रा. राळेभात वस्ती असे चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची ची बोलेरो गाडी एम एच. 23 ए. यु. 8485 पडल्याने एकच मोठा आवाज झाला.

यामुळे जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले, व चारही तरूणांना बाहेर काढले आणि ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता. अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे. चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता.

पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात काम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चार पैकी दोघांचे लग्न झाले होते. त्यांना लहान लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्याला भरली हुडहुडी; थंडी वाढणार की घटणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- थंडीला चांगलीच सुरुवात झाली असून, आता हुडहुडी भरू लागली आहे....

धोका वाढला! पारनेर तालुक्यात भीतीचे वातावरण; पालकमंत्री विखे पाटील यांची घेतली भेट, मागणी काय?

पारनेर/ नगर सहयाद्री:- तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यावर तातडीने उपाययोजना...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या वाटेतील अडथळे दूर होणार, व्यापार वाढणार! तुमची रास काय?

मुंबई / नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल...

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...