spot_img
महाराष्ट्रचंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; लोकसभा निवडणुकीपूर्वी...

चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट; लोकसभा निवडणुकीपूर्वी…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने मोठी ऑफर दिल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्ष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ नका म्हणून त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना सांष्टांग दंडवत घातला होता. तर आता त्यांनी अजून एक गौप्यस्फोट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

तर भाजकापडूनही आपल्याला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा खैरे यांनी केला. हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपाल पदासाठी आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत होते, असे सूतोवाच त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आक्रमकपणा दाखवतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधातील धार कमी केल्याचे दिसून आले. उद्धव सेनेने मध्यंतरी फडणवीस यांचे कौतुक केले. तर देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्यावर राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाल्याचे दिसले. दोघांमधील हास्यविनोद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांनी एकमेकांना काय कानमंत्र दिला यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...