spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

महाराष्ट्रात हळहळ! दुर्घटनेत १७ जणांचा अंत, काय घडलं पहा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. विरार पूर्वेतील विजय नगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर ३६ तासांनंतर आणखी दोन मृतदेहांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत २६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. तर आत्तापर्यंत १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात भीषण दुर्घटना घडली. रमाबाई अपार्टमेंटचा इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत अनेक कुटुंबे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून मदत व बचावकार्य राबवलं जात आहे. जेसीबीसारखे यंत्रे घटनास्थळी पोहोचू शकत नसल्यानं ढिगारा हटवण्यात अडथळे निर्माण झाले. मात्र, दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला आणि त्यामुळे बचावकार्यास वेग मिळाला.

एनडीआरएफचे रेस्क्यू ऑपरेशन दुसऱ्या दिवशीही सुरूच असून, आतापर्यंत २६ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. यापैकी १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ९ जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत ओमकार जोईल हे व्यक्ती बेपत्ता होते. त्यांचा मृतदेहही सापडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जर अजूनही कुणाचे नातेवाईक किंवा ओळखीचे व्यक्ती बेपत्ता असतील, तर त्याबाबतची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी, असं आवाहन विरार पोलीस नागरिकांना करत आहेत.

दरम्यान, लक्ष्मण सिंग (२६ वर्ष), आरोही ओंकार जोवील (२४ वर्ष), उत्कर्षा जोवील (१ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. अजून बाकी मृतांचे नावं समोर आलेली नाहीत. तर प्रमिला प्रभाकर शिंदे (५० वर्ष), प्रेरणा शिंदे (वर्ष २०), प्रदीप कदम (वय ४०), जयश्री कदम (वय ३३), मिताली परमार (वय २८), संजय स्वपंत सिंग (वय २४), मंथन शिंदे (वय १९), विशाखा जोवील (वय २४), प्रभावकर (वय ५७) अशी दुर्घटनेतील जखमींची नावे आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांचा खर्चपाणी तिथूनच चालतो, ते तुम्हाला काय पाणी देणार?, माजी खासदार विखेंची खासदार लंके यांच्यावर टीका!

कान्हूरपठार। नगर सहयाद्री:-  पठार भागाला पाणी मीच देणार, असे आश्वासन माजी खासदार सुजय विखे पाटील...

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम, सरकार सावध, विखे पाटील म्हणाले, आम्ही…

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने...

सासऱ्यासह पत्नीवर कोयत्याने सपासप वार; सावेडी उपनगरात दारुड्या पतीचा भयंकर कांड

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील वैदुवाडी येथे दारुच्या नशेत पती अर्जुन राजू शिंदे याने...

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार शनिवारी नगर शहरात; अरुण पाटील कडू यांचा अभीष्टचिंतन सोहळा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रांत योगदान देणारे ज्येष्ठ नेते,...