spot_img
ब्रेकिंगपोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

पोलीस दलात खळबळ! उपनिरीक्षकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल

spot_img

पणे । नगर सहयाद्री:-
कायद्याचे रक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस खात्याची काही भक्षक बनलेल्या पोलिसांमुळे बदनामी होत असते, अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. जातीवाचक शिवीगाळ, तसेच बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नोंदणी पद्धतीने तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्याकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये उपनिरीक्षकाने घेतले. उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्याने विवाह नाकारुन तरुणीला जातीवाचक शिवीगाळ केली, तसेच गर्भपात करण्यास भाग पाडले, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत एका २८ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), त्याचा भाऊ कुणाल, तसेच वडील गजानन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज गावडे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. २०२० मध्ये त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवून ठेवली. पीडित तरुणीला पत्नीप्रमाणे दर्जा दिला नाही. तरुणीने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराज याने तरुणीकडून वेळोवेेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. त्याने तरुणीशी संबंध ठेवले.

दरम्यान, विराज याची उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्याच्याकडे विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करुन दे, तसेच विवाहाची माहिती त्यांना दे, अशी विनंती तिने केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझे कुटुंबीय माझ्याशी स्थळ पाहत आहेत. तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाही. माझा विचार सोडून दे’, असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...