spot_img
अहमदनगरशहरात खळबळ! खासदार ओवेसी यांच्या सभेला विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी,...

शहरात खळबळ! खासदार ओवेसी यांच्या सभेला विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी, वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेस विरोध करणाऱ्या वकिलास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस अधीक्षकांना निवेदन देणे एका वकिलाला महागात पडले आहे. या कृतीचा राग मनात धरून आरोपीने सार्वजनिकरित्या डिजिटल चॅनलवरून शेवटची वॉर्निंग देत वकिलास जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी हर्षद मनोज चावला (वय २९, रा. मिस्कीन नगर, सावेडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सिराज जहागीरदार (रा. मुकुंदनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सिराज जहागीरदार याने ‘डिजिटल अहिल्यानगर’ आणि ‘झिरो न्यूज’ या डिजिटल चॅनल्सच्या माध्यमातून चावला यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करत, ही शेवटची वॉर्निंग असे म्हणत जिवे मारण्याची उघड धमकी दिली. चावला यांनी याआधी ओवेसी यांच्या सभेला विरोध दर्शवत पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले होते. ही धमकी मिळाल्यानंतर वकिल चावला यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील टिप्स सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.

१६ वर्षीय मुलीचे अपहरण
नवनागापूर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (दि. २० सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, १६ वर्षीय मुलगी घरातून अचानक गायब झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही सापडली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला रखवालीतून पळवून नेले, असा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा विनयभंग
नगर तालुक्यातील कडमाळ येथे भावाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका ३४ वर्षीय महिलेचा दोन व्यक्तींनी मारहाण करत विनयभंग केला. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या शेजारी राहणाऱ्या भावाच्या घरातून जोरजोरात भांडणाचा आवाज येत असल्याचे ऐकून मध्यस्थी करण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी एक आरोपी तिच्या भावास मारहाण करत होता. महिलेने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली व तिचा हात पकडून घरात ओढून नेले. तेथे तिने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. त्यानंतर काही वेळाने दुसरा आरोपी घटनास्थळी आला आणि त्यानेही पीडित महिलेला कानशिलात मारून धक्काबुक्की केली असल्याचे फिर्यादत नमूद करण्यात आले आहे.

२३ वर्षीय तरुणावर रॉड हल्ला
शहरातील सुहानानगरी परिसरात रविवारी दुपारी एका २३ वर्षीय तरुणावर जुन्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कृष्णा नानाभाऊ गायकवाड (वय २३, रा. रासेवाडी रोड, भोगाई गल्ली, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदेश गोरख शिंदे (रा. देवगाव, ता. नगर) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गायकवाड हे बाणेश्वर हेअर सलूनजवळ थांबले असताना, आरोपीने तेथे येऊन जुन्या भांडणाचा राग मनात धरून प्रथम शिवीगाळ केली व नंतर रॉडने डोक्यावर घातक वार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. तसेच संबंधित आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक राम मोरे करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कोठला झोपडपट्टीत गोमांस विक्री; छाप्यात १८० किलो मांस जप्त, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शासनाने प्रतिबंध केलेल्या गोमांस विक्रीवर तोफखाना पोलीसांनी कोठला झोपडपट्टीत मोठी...

राज्यात थंडीची लाट, तापमान १२.६ अंशांवर; कुठे किती…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात थंडीचा जोर वाढला असून, जळगाव, पुणे आणि नाशिकसह अनेक...

तयारीला लागा! महापालिका निवडणुकीची मोठी अपडेट समोर; आचारसंहिता कधी पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, पहिल्या टप्प्यातील...

बिबट्या ठार मारा; तरच चिमुकलीवर अंत्यसंस्कार, खारे कर्जुने ग्रामस्थांचा गाव बंदचा निर्णय

खारे कर्जुने ग्रामस्थांचा निर्णय | गाव बंद | शाळा, महाविद्यालय बंद | बिबट्यांनी हादरवला...