मुंबई / नगर सह्याद्री –
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं आहे. हाके यांच्या वक्तव्याचा समाचार मराठा आंदोलकांकडून घेतला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेतही लक्ष्णण हाकेंवर निशाणा साधण्यात आला. ‘मराठा आंदोलकांवर अगदीच वेळ आली तर रस्त्यावर ठोकायची गरज आहे, असं म्हणत मराठा आंदोलक राजेंद्र कोंढरे पाटील यांनी हाकेंना मोठा इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत राजेंद्र कोंढरे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी कोंढरे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. कोंढरे पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाला एकाकी पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाचं मुख्य अपयश म्हणजे आपण सगळ्यांवर बोलत राहिलो. संजय राऊत क्रांती मोर्चाला मूक मोर्चा म्हणाले, त्यांच्यावर सगळे तुटून पडले. त्यानंतर अजून दुसरे बोलले’.
‘आपला मूळ मुद्दा बाजूला राहिला. त्यामुळे आता आपल्या मूळ मुद्दा सोडू नका. त्यामुळे हाके यांना सगळ्यांनी उत्तर देत बसू नका. आपली चांगली अकरा लोकांची टीम तयार करा. त्यांनीच फक्त त्याला ठोकायचं आणि अगदीच वेळ आली तर मग त्याला रस्त्यावर ठोकू. आमच्या लेकीबाळीची इज्जत काढत आहे, असे कांढरे पाटील पुढे म्हणाले.
हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यानंतर मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
‘हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मात्र ते मला बघायचे आहेत. त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सर्वांना अंतरवालीत यावं, असं आवाहन करतोय. जे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीनुसार असेल, तरी मी बरोबर करणार आणि हैदराबाद गॅझेटच्या आधारे दिले असतील. तर मी पुढे काय करायचं हे सांगणार आहे. मी यावर उद्या बोलणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.