spot_img
देशदहशतवादी मसूद अझहर ढसाढसा रडला, म्हणाला ‘मी मेलो असतो तर…’

दहशतवादी मसूद अझहर ढसाढसा रडला, म्हणाला ‘मी मेलो असतो तर…’

spot_img

Masood Azhar: भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्य मारले गेल्याचा दावा त्याने स्वतः एका निवेदनाद्वारे केला आहे. या कारवाईनंतर त्याने तीव्र संताप व्यक्त करत, काश, मी पण त्या काफिल्यामध्ये सामील झालो असतो, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मसूद अझहरने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्लाहताला म्हणतात की शहीद जिवंत आहेत. ते अल्लाहचे प्रिय पाहुणे आहेत. माझ्या कुटुंबातील दहा सदस्यांना आज रात्री एकत्र हे सुख लाभले.  त्याने मारल्या गेलेल्यांमध्ये पाच निष्पाप मुले, मोठी बहीण, प्रिय भाची, विद्वान भाचा आणि त्याची पत्नी, तसेच आणखी एक विद्वान भाची यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, हुजैफा नावाचा कथित मित्र आणि त्याची आई, तसेच आणखी दोन साथीदार असे एकूण चौदा जण मारले गेल्याचे त्याने सांगितले.

अझहरने म्हटले की, पंतप्रधान मोदींनी निष्पाप मुलांना, बुरखाधारी महिलांना आणि वृद्धांना लक्ष्य केले. दुःख इतके आहे की ते शब्दांत मांडता येत नाही, पण कोणताही खेद, निराशा किंवा भीती नाही. उलट, वारंवार मनात येते की, काश मी पण या चौदा सदस्यांच्या भाग्यवान ताफ्यात सामील झालो असतो. पण अल्लाहला भेटण्याची वेळ निश्चित असते, ती पुढे-मागे होत नाही. आमच्या एका घरात एकूण चार लहान मुले होती, तीन ते सात वयोगटातील. चौघेही एकत्र स्वर्गात गेले. त्यांचे आई-वडील एकटे राहिले, पण ‘पहिल्या शतकांसारखे’ हे सुख फक्त त्यांनाच मिळते ज्यांच्यावर अल्लाह प्रेम करतो.” त्याने पुढे म्हटले की, त्यांच्या जाण्याची हीच वेळ निश्चित होती, पण अल्लाहने त्यांना मृत्यू नाही, तर जीवन दिले.

मसूद अझहरनेभारताला धमकीवजा इशारा देत म्हटले की, जमूदीच्या (भारताच्या) या क्रूरतेने सर्व नियम तोडले आहेत. आता तिथे कोणीही दयेची अपेक्षा करू नये. त्याने पुढे म्हटले की, बॉम्बहल्ल्यात शहीद झालेल्या जामा मशीद सुबहान अल्लाहचा घुमट शत्रूंवर इतका कोपेल की त्यांच्या वंशजांनाही ते आठवेल, इंशाअल्लाह. बहावलपूरमध्येया चौदा जणांची जनाजा नमाज (अंत्यसंस्कार प्रार्थना) गुरुवारी दुपारी चार वाजता होणार असल्याचे त्याने सांगितले. असा कोणता मंदिर आहे जो श्रद्धा, सन्मान आणि क्षमेच्या या संधीपासून वंचित राहील? असा उपरोधिक आणि धमकीवजा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...