अहिल्यानगर । नगर सहयाद्री
मी नथुराम गोडसेंचा विचार वारकरी व्यासपीठावर मांडला नाही. पण मला तो विचार मांडण्याचा अधिकार आहे, तो संविधानाने दिला आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी माझ्या विरोधात मुद्दाम चुकीचा व्हिडिओ पसरवला. जर त्यांनी अशा प्रकाराला पाठिंबा दिला, तर संगमनेर पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला. माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात संगमनेरमध्ये 21 ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची पार्श्वभूमी 16 ऑगस्ट रोजी घुलेवाडी (ता. संगमनेर) येथे पार पडलेल्या किर्तनादरम्यान निर्माण झालेल्या वादावर आधारित आहे. संग्राम बापू भंडारे महाराज या वादाच्या केंद्रस्थानी असून, त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली.
16 ऑगस्ट 2025 रोजी संगमनेर भुलेवाडी गावात माझा धर्म किर्तनाचा कार्यक्रम 9 वाजता सुरु झाला. मी भगवान तुकराम महाराजांच्या अभंगावर निरुपण सुरु केलं. काही लोक तिथे मुद्दाम भांडण्यासाठीच आले होते असा दावा संग्राम बापू भंडारे महाराज यांनी केला. किर्तन चालू होतं, त्यांना भांडण्यासाठी मुद्दा भेटत नव्हता. अखेर 10.30 वाजण्याच्या सुमारास एकाने चालू किर्तनात बडबडायला सुरुवात केली. मी त्यांना शांत बसण्याची विनंती केली. पण ती व्यक्ती उभी राहून बोलू लागली. त्यावेळी मी सहकाऱ्यांना विनंती केली की, यांचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे यांना बाजूला न्या असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.
त्याचवेळी पाच-सहाजण एक्टिव झाले. माझ्या अंगावर धावून आले. त्याचवेळी पाच पन्नास हिंदुत्ववादी भगव्या टोप्या घालून आमचे सहकारी तिथे होते, त्यांनी जागेवरच त्यांना रोखलं. जर त्या दिवशी पाच-पन्नास हिंदुत्ववादी नसते तर?असा सवाल संग्राम बापू भंडारे यांनी केला. तसेच मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हल्ल्याच गांभीर्य समजून घ्यावं. असं हल्लेखोरांना समर्थन दिलं, तर संगमनेर पेटेल असही संग्राम बापू भंडारे म्हणाले. हल्लेखोरांच्या मागे थोरात उभे राहिले, असं नरेटिव्ह सेट झालं, तर पोरं उद्या हल्ले करतील थोरात मागे आहेत बोलतील. बाळासाहेब थोरातांनी आत्मपरिक्षण करावं. थोरातांनी 40 वर्ष संगमनेरच नेतृत्व केलं, आज एका धर्म कितर्नकारावर तुटून पडताय, थोरातांनी आत्मपरिक्षण करावं” असं संग्राम बापू भंडारे महाराज म्हणाले.