spot_img
मनोरंजनRanveer Kapoor-Alia Bhatt News ...तर माझ्या बायकोने मला मारलं असतं; रणबीर कपूर...

Ranveer Kapoor-Alia Bhatt News …तर माझ्या बायकोने मला मारलं असतं; रणबीर कपूर आलियाबद्दल असे का म्हणाला?

spot_img

Ranveer Kapoor-Alia Bhatt News : मुंबई / नगर सह्याद्री –
रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमल चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शनानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. मुलगा व वडिलांचं नात्यातील चढ-उतार आणि रक्तपात ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला. अंगावर शहारे आणणारा ट्रेलर आहे.

रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर व संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. ते चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अशातच रणबीर कपूरने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खुलासा केला की राहाचा जन्म अ‍ॅनिमलच्या शूटिंगदरम्यान झाला होता.

नुकताच दिल्लीत अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉबी देओल, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आणि निर्माता भूषण कुमार देखील उपस्थित होते. रणबीर कपूर पूर्ण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिथे पोहोचला होता. यावेळी मीडियाशी बोलताना रणबीर म्हणाला, मी या चित्रपटाचं शूटिंग करत असताना माझी मुलगी राहा हिचा जन्म झाला. पण मी आधी शूटिंग केले आणि नंतर घरी जाऊन तिला पाहिलं.

रणबीरने खुलासा केला की अशी हिंस्त्र भूमिका करूनही तो त्याच्या पात्राचा वैयक्तिक आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जसा आहे, तसाच तो कुटुंबाला जाऊन भेटतो. मी एक वेगळी व्यक्ती आहे. मी माझ्या भूमिका कधीही घरी नेत नाही. हेच माझ्या कुटुंबासाठी चांगलं आहे. मी घरी जाऊन असं वागलो असतो, तर माझ्या बायकोने मला मारलं असतं, असं रणबीर म्हणाला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...