spot_img
ब्रेकिंग..तर एका तासात मुंडे सहआरोपी होतील; जरांगे पाटलांचा मोठा दावा

..तर एका तासात मुंडे सहआरोपी होतील; जरांगे पाटलांचा मोठा दावा

spot_img

Manoj Jarange Patil: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असलेल्या वाल्मिक कराडमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर मुंडेंवर राजकीय दबाव वाढल्यामुळे त्यांना आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करावी तसेच त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करावी अशी मागणी आता विरोधकांकडून केली जात आहे. अशातच आता धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

जरांगे पाटील म्हणाले, या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आंधळेला धनंजय मुंडेंनीच फरार केलं आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात सहआरोपी करा. तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंची पूर्ण माहिती आहे. मुंडे 302 मध्ये मुख्य आरोपी होतील एवढे पुरावे तपास यंत्रणेकडे आहेत.

मुंडेंबाबतचे पुरावे सापडले नसल्यामुळे काही करता येत नाही, असं मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. 302 कलमा अंतर्गत धनंजय मुंडेंवर कारवाई करता येईल. पण त्यांना सरकार वाचवत आहे. फडवणीसांनी फक्त धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, असं म्हटलं तर एका तासात ते सहआरोपी होतील असे ते म्हणाले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...