spot_img
अहमदनगर'त्यांना' दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

‘त्यांना’ दिल्लीच्या जनतेने जागा दाखविली; मंत्री विखे पाटील

spot_img

लोणी | नगर सह्याद्री
भारतीय जनता पक्षाने दिल्लीच्या विधानसभेत मिळविलेला एैतिहासिक विजय विचारांचा आणि विकासाचा असून, पद्मविभूषण डॉ.आण्णासाहेब हजारे यांच्याशी प्रतारणा करणा-यांना दिल्लीच्या जनतेने त्यांची जागा दाखविली असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

दिल्ली मध्ये भारतीय जनता पक्षाला 27 वर्षांनंतर मिळालेल्या विजयानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राला दिल्लीच्या जनतेने दिलेले हे समर्थन आहे. या निवडणूकीतील विजयाचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या  यशस्वी रणनितीला जनतेने साथ दिली. या विजयाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करुन, विकास प्रक्रीयेच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेने केला होता, त्याचे विजयात रुपांतर झाल्याचे त्यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट्राचारी राजवटीला जनता कंटाळली होती. लोकांच्या नावाखाली योजना तयार करुन, त्यातील स्वाथपणा हा जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, जेष्ठ समाजसेवक पद्मविभूषण डॉ. आण्णासाहेब हजारे यांच्या नावाचा उपयोग करुन, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्तिगत राजकारणाला महत्व दिले. त्यांच्या विचारांशी केलेल्या प्रतारणेला जनतेनेच त्यांचा पराभव करुन उत्तर दिले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

मागील काही दिवसात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने मतदान यादीतील आकडेवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेची खिल्ली उडवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, आता तरी राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दिल्लीच्या जनतेने कॉग्रेसला सपशेल नाकारले आहे. परदेशात जावून देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर टिका करणा-यांना जनता थारा देत नाही हे दिल्लीच्या निकालाने काँग्रेसला दाखवून दिले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का? राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ओबीसी आरक्षणावरून शुक्रवारपासून वातावरण पुन्हा तापले आहे. बीडमध्ये ओबीसी...

अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत; पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर | नगर सह्याद्री सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर...

मनसे-महाविकास आघाडीच्या मागणीला यश; निवडणूक आयोगाचे मतदार यादीतील घोळ तपासण्याचे आदेश

मुंबई । नगर सहयाद्री  राज्यातील मतदार यादीमधील घोळ आणि गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांनंतर निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना...

साई संस्थानमधील ४७ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;नेमकं प्रकरण काय?

शिर्डी । नगर सहयाद्री:- साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल ७७ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याच्या...