spot_img
अहमदनगरकापूरवाडीत गौण खनिजांची चोरी

कापूरवाडीत गौण खनिजांची चोरी

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री;-
नगर तालुयातील कापुरवाडी शिवारातील शासकीय जमिनीतून अवैधरित्या उत्खनन करून गौण खनिजाची चोरी केल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द सामुहिक चोरी, फसवणूकसह माईन्स अ‍ॅड मिनरल अ‍ॅट १९५७ चे कलम ४ व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडलअधिकारी जीवन भानुदास सुतार (रा.भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. ऋषीकेश संभाजी भगत, महादेव परसराम भगत, भैरवनाथ जनार्धन भगत, गणेश विठ्ठल भगत, सतीष विठ्ठल भगत, अनिरूध्द संजय लाकुडझोडे व सुधीर संजय लाकुडझोडे (सर्व रा. कापुरवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार २७ जून रोजी दुपारी एक ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी गौण खनिजाची चोरी करून १० लाख ३७ हजार रूपयांचा महसूल बुडून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित आरोपी हे कापुरवाडी शिवारात अनधिकृतरित्या के्रशर चालवितात. यासाठी लागणारा कच्चा माल त्यांनी कापुरवाडी शिवारातील शासकीय जमीन सर्व्हे नंबर २६९ मधून अवैधरित्या उत्खनन करून त्याची चोरी केली.

कोणत्याही प्रकारचा वाहतुक परवाना व विक्री परवाना त्यांच्याकडे नसतानाही त्यांनी सदरचा उत्खनन केलेला माल खासगी जमिनीत साठवणूक केला. सदरचा प्रकार मंडलअधिकारी जीवन सुतार व त्यांच्या सहकार्‍यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...