अहिल्यानगर | नगर सह्याद्री
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रावर सुरक्षेच्या उद्देशाने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. केडगाव च्या शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.267, 269, 270 तसेच माळीवाडा परिसरातील हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्र.221, 222 या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
या बाबतची माहिती अशी की नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नगर शहर मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाने वेबकास्टिंग केले होते. सदर वेबकास्टिंग करण्याचे काम मॅनेजिंग डायरेक्टर, आयनेट सिक्युअर लॅब प्रा. लि. चेन्नई या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीमार्फत नगर शहारामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करीता आतील बाजु व बाहेरील बाजु मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम महेश सुभाष गवळी (वय 32, रा.पागीरे पेट्रोल पंपाजवळ, घोडेगाव, ता. नेवासा) यांना देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दि. 16 नोव्हेंबर रोजी रात्री साडे आठ वाजल्या पासुन नगर शहर अंतर्गत मतदान केंद्रावरील प्रत्येक बुथवर वेबकॅमेरे बसवण्याचे काम सुरु केले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर, केडगाव येथील बुथ क्रमांक 267 मधील आतील बाजुचा कॅमेरा नंबर एच एफ 4 जी 053884 तसेच बुथ क्र- 269 येथील बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र एच एफ 4 जी 071277 त्यानंतर बुथ क्र 270 बाहेरील बाजुचा कॅमेरा क्र- एच एफ 4 जी 065750 तसेच हिराबाई सुर्यवंशी प्राथमिक शाळा माळीवाडा, रुम नं 3 बुध नं. 222 बाहेरील बाजुचा कॅमेरा नं एच एफ 4 जी 050737, रुम नं-2 बुथ नं. 221 बाहेरील बाजुचा कॅमेरा नं- एच एफ 4 जी 066639, असे वेगवेगळ्या नंबरचे कॅमेरे बसवण्यात आले होते.