spot_img
अहमदनगरपोलिसांना टीप देणे युवकाला भोवले, काय घडलं पहा..

पोलिसांना टीप देणे युवकाला भोवले, काय घडलं पहा..

spot_img

अहिल्यानगर / नगर सह्याद्री
एलसीबीच्या पोलिसांना तलवार विक्री करत असल्याची माहिती दिल्याच्या आरोपावरून युवकाला चाकू, लाकडी दांडके, दगड, पट्ट्याने मारहाण केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली होती. यात जखमी असलेल्या करण अर्जुन साळुंके (वय २२ रा. जे.जे. गल्ली, कोठला) या युवकाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे.

सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार (दोघे रा. मंगलगेट, अहिल्यानगर), सचिन लल्लू पवार (रा. कडा ता. आष्टी जि. बीड), प्रवीण सुभाष पवार (रा. भिस्तबाग चौक, सावेडी) व रंजित एकनाथ साळुंके (रा. गजराजनगर, अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रस्ता) यांच्यावर ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी (२ नोव्हेंबर) रात्री करण हा कोठला परिसरातील कोंड्या मामा चौक येथे असताना त्याचा नातेवाईक सचिन सर्जेराव चव्हाण, संतोष भैरवनाथ पवार व सचिन लल्लु पवार हे दुचाकीवरून तेथे आले.

अनिल सर्जेराव चव्हाण यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गजराजनगर येथे जायचे आहे, असे म्हणत त्यांनी करण याला दुचाकीवर बसवून गजराजनगर परिसरातील बांबुच्या दुकाना जवळ नेले. तेथे गेल्यानंतर प्रवीण पवार, रंजित साळुंके हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू एलसीबीच्या पोलिसांना मी तलवार विक्री करतो म्हणून माझी माहिती का दिली’ असे म्हणत हत्याराने वार केला. लाकडी दांडके, दगड, कंबर पट्ट्याने मारहाण करून जखमी केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले आहे. पोलिस पसार आरोपींचा शोध घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसामुळे नुकसान झालेल्या केडगाव अमरधाम, आंबेडकर भवनाची आयुक्तांकडून पाहणी

पडलेल्या भिंती बांधण्याचे काम तत्काळ सुरू करा : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर ।...

मनपा, झेडपी निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले!, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेकडून जोर बैठका..

सुनील चोभे | नगर सह्याद्री आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका, नगर पंचायती, नगर परिषदा,...

ठाकरे ब्रँड बुडाला! आदित्य ठाकरेंचा पावसाळा आता कारागृहात?; मंत्री नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य…

Politics News: राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून...

शहरासह जिल्ह्यात बकरी ईद उत्साहात साजरी; शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी...