spot_img
अहमदनगरतरुणाने गळफास घेऊन जिवन संपवल..; धक्कादायक कारण उजेडात! डायरीमध्ये आढळला मजकूर..

तरुणाने गळफास घेऊन जिवन संपवल..; धक्कादायक कारण उजेडात! डायरीमध्ये आढळला मजकूर..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय आसा मजकूर डायरीमध्ये लिहुन एका तरूणाने जिवन संपवल्यचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कालिदास अभिमन्यू मिसाळ, ( वय ४० वर्ष, रा. आरणगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ ( वय ४३ रा. आरणगाव ) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आलेश बाबुराव जगदाळे, भगवान रामा जायभाय, शायरा नियमत सय्यद ( सर्व रा. जामखेड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत कालिदास मिसाळ याने दोन वर्षापुर्वी शेतीच्या कामासाठी खासगी सावकार आलेश बापुराव जगदाळे याच्या कडुन १ लाख रु कर्ज काढले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास हा वर्षभर आरोपीच्या ट्रॉक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. कालिदासजारी पडल्यानंतर त्याचा मुलगा प्रदिप कालिदास मिसाळ हा देखील ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून कामाला जात होता. एक वर्ष कालिदास व त्याच्या मुलाने चार महीने आसे मिळुन दोघांनी चौदा महीने आरोपीकडे ड्रायव्हर म्हणून काम केले होते. तरीदेखील आरोपी आलेश जगदाळे हा एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल आसे मिळुन एकुण ३ लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच घरी येऊन तु मेला तरी कर्जाची रक्कम तुझ्या मुलाकडून व बायकोकडुन वसुल करेल आशी धमकी देत होता. तसेच दुसरा सावकारभगवान रामा जायभाय याच्या कडुन मयत कालिदास मिसाळ याने घर खर्चासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या व्याजापोटी आरोपी भगवान जायभाय हा १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत होता. तसेच तिसरी महीला आरोपी शायरा नियामत सय्यद रा. पाटोदा (गरडाचे) हीच्या कडुन देखील ३० हजार रुपये घरखर्चासाठी कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून एकुण ४० हजार रुपयांची मागणी करत होते.

फीर्यादीच्या भावाची परीस्थिती अतिशय हलाखीची आसल्याने तो लवकर पैसै देऊ शकत नव्हता तसेच वरील लोक मला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करतात आसे देखील मयत कालिदास याने आपल्या भावास सांगितले होते. आखेर याच त्रासाला कंटाळून सोमवार दि १४ ऑक्टोबर रोजी पहाटे कालिदास अभिमन्यू मिसाळ याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मयताच्या खिशात एक डायरी आढळून आली व या डायरीत एका पानावर आलेश बाबुराव जगदाळे जामखेड व भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे आपला वि. आसा लिहलेला मजकुर आढळून आला आहे. आरोपींनी मयत कालिदास मिसाळ यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी सावकार भगवान रामा जायभायला अटक केली असून पुढील तपास पो. नि. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.

मृत्यूनंतर देखील महीला सावकाराचा फोन
मयत कालिदास मिसळला यांच्या मृत्यूनंतर सकाळी ८.३७ वाजता खासगी सावकार शायरा नियामत सय्यद यांचा मयत कालिदास याच्या मोबाईलवर फोन खणखणला. महीला फोनवर म्हणाली की कालिदास मिसाळ कोठे आहे, त्याच्याकडे आसलेले माझे पैसै मला पाहिजेत त्याच्याकडे फोन द्या, यावेळी फीर्यादी याने सांगितले की माझ्या भावाने आत्महत्या केली आहे आसे म्हणताच आरोपी महीलेने फोन कट केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा सोडणार!

नेवाश्याची जागा राष्ट्रवादीकडे घ्या मी प्रवेश करतो; अजित पवार यांना घातले साकडे एकनाथ शिंदे यांच्या...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मंत्री आदिती तटकरेंचा मोठा दिलासा…

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव...

Manoj Jarange : आता आमची सटकली, घात केला आता सुट्टी नाही..

अंतरवली सराटी / नगर सह्याद्री : ज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग...

पारनेरमध्ये अजित पवारांनी फुंकले रणशिंग; एकी टिकवा अन्यथा…, नेमकं काय म्हणाले पहा…

एकाला कोणाला तरी उमेदवारी मिळणार : अजित पवार / विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादीचा...