spot_img
अहमदनगरहॉटेलमध्ये कामगार भिडले, पुढे नको तेच घडले! कारण काय?

हॉटेलमध्ये कामगार भिडले, पुढे नको तेच घडले! कारण काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर तालुयातील दरेवाडी फाटा येथील शौर्य चायनीज हॉटेलमध्ये दोन कामगारांत वाद झाले. एकाने दुसर्‍यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. श्रेयस रेवन भागीवंत (वय १८ रा. वांबोरी ता. राहुरी, हल्ली रा. दरेवाडी फाटा, ता. नगर) असे जखमी कामगार युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान भागीवंत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचार्यी (पूर्ण नाव, पत्ता नाही) या कामगाराविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरेवाडी फाटा येथे सुरज लोखंडे यांचे शौर्य चायनीज नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलवर श्रेयस भागीवंत व आचार्यी हे कामगार आहेत. साडेदहाच्या सुमारास ते दोघे हॉटेलवर असताना दोघेही साफसफाईचे काम करत होते.

काऊंटर साफ करण्यावरून आचार्यी याने श्रेयसला शिवीगाळ करून मारहाण केली. चिकन तोडण्याच्या चाकूने श्रेयसवर दोन ते तीन वेळा वार करून त्याला जखममी केले. जखमी श्रेयसवर नगरमधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला असून पोलिसांनी आचार्यी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार जे. एस. फुंदे करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Honda Shine नव्या लूकसह लॉन्च! परवडणारी किंमत, अतिरिक्त फीचर्स..

2025 Honda Shine: Honda Shine 100 चा नवीन 2025 अवतार भारतीय बाजारात सादर करण्यात...

पोलिसांना मिळालेली खबर पक्की निघाली, ‘स्प्रिंग ब्रुक लॉज’ मध्ये…धक्कादायक प्रकार

Crime News कल्याणीनगर येथे निवासी भागात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! एफआरपी बाबत कोर्टाचा आदेश..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या नशिबात दडलंय काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...