अहमदनगर । नगर सहयाद्री:-
येथील नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक केंद्रीय सहकार खात्याचे मुख्य सचिव डॉक्टर आशिष कुमार भुतानी यांनी केले. ते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील सहकार प्रशिक्षण सभागृहात मल्टीस्टेट पतसंस्था महा अधिवेशनानिमित्त कार्यक्रमास आले असता नागेबाबा मल्टीस्टेट च्या नेवासा येथील शाखेमध्ये धावती भेट दिली.
यावेळी नागेबाबा संस्थेच्या उपक्रमाबाबतची माहिती जाणून घेतली. संस्थेने सुरू केलेल्या अहमनगर शहरातील हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्थेची माहिती घेऊन त्याचे विशेष असे कौतुक केले आहे.
गोशाळेबाबतही माहिती जाणून घेतली, तसेच 12 तास 365 दिवस अहोरात्र सेवा देणारी एकमेव देशातील अग्रगण्य अशी नागेबाबा मल्टीस्टेट, या संस्थेस जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केल्यामुळे तसेच या संस्थेचे सामाजिक काम, सोने तारण कर्ज, शिस्तप्रिय कार्य, शिस्तप्रिय कर्मचारी, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार या कार्याबाबत डॉक्टर आशिष कुमार यांनी कौतुक करून या संस्थेच्या विकासावर आनंद व्यक्त केला.