spot_img
ब्रेकिंगमहिलांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली तर टोळक्याने केले सपासप वार! भयंकर घटनेनं...

महिलांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली तर टोळक्याने केले सपासप वार! भयंकर घटनेनं फोडला घाम..

spot_img

Maharashtra Crime News: महिलांनी डोळ्यात मिरची पावडर फेकली तर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत युवकाची हत्या केल्याचा भयंकर प्रकार शहरात घडला आहे. विशांत भोये (29) असे मृत तरुणाचे आहे. या प्रकरणी पंचवटी परिसरातील आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या घटनेने पंचवटी परिसर हादरला आहे

अधिक माहिती अशी: नाशिक शहरातील पंचवटीमध्ये काल रात्री सव्वा दहा ते साडे दहाच्या सुमारास बिडी कामगारनगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ विशांत भोये आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. यावेळी त्याठिकाणी अचानक काही महिला आल्या आणि त्यांनी विशांत व त्याच्यासोबत उभ्या असलेल्या मित्रांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली.

त्यानंतर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने विशांतवर हल्ला केला. यातील एका संशयिताने विशांतला थेट कोयत्याने छातीवर वार केला. यावेळी विशांत जमिनीवर धारातीर्थ पडला. विशांतला त्याच्या मित्रांनी तत्काळ उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या छातीवर वर्मी घाव लागल्याने डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून किरकोळ वाद झाला होता, त्यातून खून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. पंचवटी मध्ये मागील आठवड्यात पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेने परिसर हादरला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; कुठे घडला प्रकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे....

घरात घुसून महिलेसोबत ‘तसले’ वर्तन; रावसाहेबवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात मद्य सेवन केलेल्या व्यक्तीने महिलेच्या घरात जबरदस्ती...

गावच्या विकासासाठी आमदार काशिनाथ दातेंनी दिला कानमंत्र; काय म्हणाले पहा…

नेप्तीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन अहिल्यानगर | नगर सह्याद्री गावा-गावातील धार्मिक एकात्मता भारतीय संस्कृतीने जोडली गेलेली आहे....

‘पारनेर ग्रामीण पतसंस्थेला ४.४३ कोटींचा नफा’

संस्थापक आ. काशिनाथ दातेंची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- सोमवार दिनांक ३१ मार्च २०२५ पारनेर...