Maharashtra Crime: एका विवाहित महिलेला मूल होत नसल्याने तिला दिलेल्या सल्लानुसार मांत्रिकाकडे गेली. मात्र मांत्रिकाची या महिलेवर वाईट नजर पडली त्यानंतर धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत मांत्रिकाविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मूल होत नसल्याने उपचार करतो म्हणत अमरावतीमध्ये एका मांत्रिकांने २० वर्षाच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.पीडित महिलेच्या डोक्यावर मांत्रिकाने मंत्र उच्चारत तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले.
या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मांत्रिकाविरोधात बलात्कार तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्याद्वारे गुन्हा दाखल केला. दिगंबर रतन चव्हाण असे या मांत्रिकाचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.