spot_img
अहमदनगरहवामान पुन्हा एकदा बदललं! बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी, ५७ जण अडकले..

हवामान पुन्हा एकदा बदललं! बद्रीनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी, ५७ जण अडकले..

spot_img

दिल्ली वृत्तसंस्था:-
हवामान पुन्हा एकदा बदललं आहे. हिमालयीन प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. सखल भागात पाऊस सुरू झाला आहे. बद्रीनाथ धाममध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. यादरम्यान, एक मोठी माहिती समोर आली आहे.

आज शुक्रवारी दुपारी बर्फवृष्टीमुळे येथे मोठी आपत्ती आली. मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळला आहे. या दुर्घटनेत ५७ कामगार बर्फाखाली अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर १६ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे.

प्रशासन आणि बीआरओ टीमला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद सुमन यांनी सांगितले की, बर्फ पडल्यानंतर ५७ कामगार गाडले गेले. तथापि, १० जणांना वाचवण्यात यश आले आहे.

अपघाताच्या वेळी एका खाजगी कंत्राटदाराचे कामगार मोठ्या संख्येने घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण बीआरओ कराराखाली काम करणाऱ्या कंत्राटदाराचे कामगार होते. जेव्हा हिमस्खलन झाले तेव्हा सर्वजण इकडे तिकडे धावू लागले. त्यापैकी काही जण वाचण्यात जाण्यात यशस्वी झाले, तर ५७ कामगार बर्फात अडकले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक प्रकार: पारनेर सहकारी साखर कारखान्यातून150 कोटींचा मुद्देमाल गायब

चौकशीतून माहिती उजेडात । बचाव समितीकडून जप्तीची मागणी पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर सहकारी साखर...

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं, नेमकं पडद्याआड काय सुरू आहे?

मुंबई / नगर सह्याद्री : ५ जुलै २०२५ या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारण एक मोठी घडामोड...

स्वच्छ सर्वेक्षणाचा पुरस्कार मनपाने विकत आणला काय?; किरण काळेंनी केली पोलखोल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर कचरामय झाल आहे. घंटागाड्या गायब आहेत. जागोजागी कचऱ्यांचे ढीग...

सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांच्या नावे; न्यायाधिकरणाचा महत्वपूर्ण आदेश, काय आहे प्रकरण पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : आई - वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण प्राधिकरणाचे...