spot_img
अहमदनगरजिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावस्त्यावरील ३ लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने १४९ टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अजूनही बरीच गावे, वाड्या वस्त्यांना टँकेरद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे टँकरचा आकडा २०० पार जाण्याची शक्यता आहे.

यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लवकरच जाणवू लागली. त्यातच उन्हाच्या चढत्या पार्‍यामुळे पाणीसाठ्यांचा जलस्तर झपाट्याने खाली जाऊ लागला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणार्‍या गावांची आणि वाड्याची संख्या एप्रिल येता-येता लक्षणीय वाढली.

एकीकडे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली आणि नियंत्रणाखाली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जात असतानाच दुसरीकडे दैनंदिन कामकाज आणि टंचाईच्या उपाययोजनांची प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे.

स्थानिक पातळीवरील यंत्रणेने टंचाई परिस्थितीवर गांभीर्याने काम करावे, आवश्यकतेनुसार पिण्याचे पाण्याचा पुरवठा करावा, टँकरचे प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार प्रांताधिकारी यांच्याकडे आहेत. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या १०० झाली होती. जिल्ह्यात १४८ गावे आणि ७८३ वाड्यावर त्यावरील तब्बल तीन लाख ५ हजार ८६६ इतया लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १४९ टँकर सुरु आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...