अहमदनगर | नगर सह्याद्री:-
कायनेटीक चौकातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्या वॉर्ड बॉयला दोघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (७ सप्टेंबर) रात्री सव्वा बाराच्या सुमारास दिल्लीगेट जवळ घडली. विवेक संतोष आमृते (वय १८ रा. लोंढे वस्ती, शिवाजीनगर) असे जखमी वॉर्ड बॉयचे नाव आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश शेवाळे (पूर्ण नाव नाही, रा. शिवाजीनगर, नगर) व संकेत पाटोळे (पूर्ण नाव नाही, रा. मंगलगेट, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास विवेक व त्यांचा मित्र सौरभ गायकवाड (रा. एकनाथनगर, केडगाव) हे दोघे दिल्लीगेट येथील गोगादेव मंदीरा जवळील महापौर शेंडगे यांच्या कार्यालया जवळ आले असता विवेक यांच्या ओळखीचे यश शेवाळे व संकेत पाटोळे तेथे आले.
काही एक कारण नसताना मागील कोणतातरी राग मनात धरून शिवीगाळ केली. शिव्या देऊ नका असे विवेक त्यांना म्हणाला असता त्यांना राग येऊन त्यांनी विवेकला लोखंडी कड्याने मारहाण करून जखमी केले. जखमी विवेक यांना उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.