spot_img
ब्रेकिंगमुलींचाच झेंडा उंच अंबरी; बारावीचा राज्याचा निकाल 91.88 टक्के, 'असा' पहा...

मुलींचाच झेंडा उंच अंबरी; बारावीचा राज्याचा निकाल 91.88 टक्के, ‘असा’ पहा निकाल..

spot_img

कोकण विभाग अव्वल
पुणे । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्याथ प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,02,873 विद्याथ उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी 91.88 आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवषप्रमाणे यंदा कोकणचा निकाल 96.74 टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर 89.46 टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे.

मुलींचा निकाल – 94.58 टक्के
मुलांचा निकाल – 89.51 टक्के

विभागनिहाय निकाल 2025
कोकण -96.74
कोल्हापूर 93.64
मुंबई – 92.93
संभाजीनगर – 92.24
अमरावती – 91.43
पुणे -91.32
नाशिक -91.31
नागपूर – 90.52
लातूर – 89.46

बारावीच्या निकालातही मुलींची बाजी
निकालात 6 लाख 25 हजार 901 मुली, तर 6 लाख 76 हजार 972 मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्य मंडळात झालेल्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते. नोंदणी केलेल्या 14 लाख 27 हजार 85 नियमित विद्यार्थ्यांपैकी 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी 13 लाख 2 हजार 873 विद्याथ उत्तीर्ण झाले. त्यातील 1 लाख 49 हजार 932 विद्यार्थ्यांना 75 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा 97.35 टक्के, कला शाखेचा 80.52 टक्के, वाणिज्य शाखेचा 92.68 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा 83.26 टक्के, आयटीआयचा निकाल 82.03 टक्के लागला.

विद्यार्थ्यांनो सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
बारावीच्या परीक्षेत नापास होणे म्हणजे सर्वकाही संपले असे होत नाही. पुन्हा तयारी करून बारावीची परीक्षा देता येते. योग्य पर्याय निवडून करिअर पुढे नेता येते. परीक्षेत नापास झाले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता उपलब्ध पर्यायांचा विचार करावा. कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्याचा विचारही करू नका. परीक्षेत नापास झाले म्हणजे आयुष्यात नापास झाले असे होत नाही. पुन्हा एकदा परीक्षेला बसा अथवा पर्यायी मार्गाचा विचार करा. यशस्वी भविष्यासाठी आत्मविश्वासाने वाटचाल करा.

निकाल कुठे पाहाल –
१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

असा पाहा निकाल?
– विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.
– होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.
– क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
– हा निकालाची प्रत डाऊनलोड करून ठेवा.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...