spot_img
ब्रेकिंगप्रतीक्षा संपली! दहावीचा 'या' तारखेला निकाल

प्रतीक्षा संपली! दहावीचा ‘या’ तारखेला निकाल

spot_img

SSC Result 2025: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या बारावीच्या निकालानंतर दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता बोर्डाने अधिकृतपणे दहावीच्या निकालाबाबत घोषणा केली आहे. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणार असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...