spot_img
ब्रेकिंगप्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण...

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी होणार, अशी चर्चा सुरू होती. अशात सरकारच्या वतीने आज रात्री खातेवाटप करण्यात आले असून गृह खाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहिले आहे. तर अर्थ खाते, राज्य उत्पादन शुल्क हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे. गृहखात्यासाठी अडून बसलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. दरम्यान, गृहशिवाय, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली होती.

कोणाला कोणते खाते पहा यादी –
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...