spot_img
ब्रेकिंगप्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींच आघाडीवर..  

प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींच आघाडीवर..  

spot_img

पुणे | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९३.३७ टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात २.१२ टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत चार दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९७.५१ टक्के. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल ९१.९५ टक्के आहे.बारावीच्या परिक्षेमध्ये मुलींचा निकाल ९५.४४ टक्के तर मुलांचा निकाल ९१.६० टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा ३.८४ टक्के ने अधिक आहे.

विभागनिहाय निकाल
* पुणे – ९४.४४
* नागपुर -९२.१२
* संभाजीनगर – ९४.०८
* मुंबई – ९१.९५
* कोल्हापूर -९४.२४
* अमरावती -९३
* नाशिक -९४.७१
* लातूर – ९२.३६
* कोकण -९७.५१

‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार निकाल?
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बीड पुन्हा हादरलं; ४ जणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं

बीड / नगर सह्याद्री - बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना...

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव, नेमकं काय केल?

नगर सह्याद्री वेब टीम Sonakshi Sinha : बॉलिवूडची फिटनेस क्वीन अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज अभिनय,...

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...