spot_img
अहमदनगरदहावीतही मुलीच हुशार...! यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी, पहा...

दहावीतही मुलीच हुशार…! यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी, पहा सविस्तर..

spot_img

Maharashtra Board 10th Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.८१ टक्के निकाल लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी लागला आहे. मंडळाच्या ९ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च दरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यंदाही मुलांपेक्षा मुलींच्या निकालाचा टक्का अधिक आहे.

महाराष्ट्र राज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्यातील १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील यंदा ९५.८१ टक्के विद्यार्थी उत्तर्णी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल १.९८ टक्क्यांनी वाढला.राज्यात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचे ९१.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तर यंदा नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला. नागपूरप विभागातील ९४.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाच्या ९ विभागीय मंडळाकडून १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली.दरम्यान, यंदाही काही विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षा दिली. राज्यातील एकूण ९ विभागीय मंडळाकडून २५,८९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २५, ३६८ विद्यार्थी प्रत्यक्ष प्ररीक्षेत प्रविष्ट झाले.

त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी परीक्षा पास झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल ८०.४२ टक्के इतका लागला आहे.सर्व विभागीय मंडळाकडून नियमीत मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ही ९७. २१ टक्के इतकी आहे. मुलांची ९४.५६ टक्केवारी इतकी आहे. त्यामुळे यंदाही मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थ्यांना ७५ टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.२७ टक्के
सर्वाधिक ९६.५३ टक्के निकाल पारनेर तालुक्याचा तर सर्वात कमी ९२.५२ टक्के श्रीरामपूर तालुक्याचा

राज्य माध्यमिक शिक्षण महामंडळाने घेतलेल्या दहावी (एसएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९५.२७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९६.५३ टक्के निकाल पारनेर तालुक्याचा तर सर्वात कमी ९२.५२ टक्केे निकाल श्रीरामपूर तालुक्याचा लागलेला आहे.

जिल्ह्यात दहावी परीक्षेस एकूण ६७ हजार ९७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात मुले ३७ हजार ३९३ तर मुली ३० हजार ५७७ असा समावेश होता. त्यापैकी ३५ हजार ०९७ मुले व २९ हजार ६६४ मुली असे मिळून एकूण ६४ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे.

अकोले-९६.३६ टक्के, जामखेड-९६.५० टक्के, कर्जत-९५.९९ टक्के, कोपरगाव-९४.३३ टक्के, नगर-९५.३३ टक्के, नेवासा-९५.७३ टक्के, पारनेर-९६.५३ टक्के, पाथर्डी-९५.७३ टक्के, राहाता-९४.४३ टक्के, राहुरी-९३.२३ टक्के, संगमनेर-९५.६०, शेवगाव-९५.८९ टक्के, श्रीगोंदा-९६.४२ टक्के, श्रीरामपूर-९२.५२ टक्के. दहावीचा निकाल लागल्यानंतर उर्त्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. अपेक्षेप्रमाणे गुण मिळाल्याने कुटुंबियांनी मुलांचे पेढे भरवून कौतुक केले.

 

 

 

 

 

 

 

 

बारावी पाठोपाठ आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे. यंदा इयत्ता दहावीत 95.81 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. यंदाही मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे.

राज्यात दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 यादरम्यान पार पडली. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली होती. त्यानुसार बारावी पाठोपाठ आता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

दहावीचे विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. आता दुपारी एक नंतर हा निकाल पाहता येणार आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...