spot_img
ब्रेकिंगपोलीस भरतीची प्रतीक्षा संपली; १५ हजार पदांची मेगा भरती, कॅबिनेटमध्ये चार धडाकेबाज...

पोलीस भरतीची प्रतीक्षा संपली; १५ हजार पदांची मेगा भरती, कॅबिनेटमध्ये चार धडाकेबाज निर्णय

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
महाराष्ट्रातील लाखो तरुणांची पोलीस भरतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. १२ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल १५ हजार पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता लवकरच वेग घेईल, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. ही बातमी पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न पाहणार्‍या तरुणांसाठी आनंदाची आहे.

महायुती सरकारने या भरतीला मंजुरी देऊन राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात ३८,८०२ पोलीस पदांची भरती पूर्ण झाली असून, आता या १५ हजार पदांमुळे पोलीस दलाला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी १८ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १३,५६० पदांची भरती जाहीर केली होती, आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही संख्या १५ हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया रखडल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये १७,४७१ जागांसाठी १७ लाखांहून अधिक अर्ज आले होते, ज्यामुळे या भरतीला मिळणारा प्रचंड प्रतिसाद स्पष्ट होतो. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उमेदवारांना पुन्हा एकदा तयारीला लागण्याची संधी आहे. अधिकृत जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर २०२५ च्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची शयता आहे.

मंत्रिमंडळातील ४ महत्त्वाचे निर्णय
गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५,००० पोलिस भरतीस मंजुरी. अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण. विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता तळरलळश्रळीूं ॠरि र्ऋीपवळपस निधी देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणार्‍या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी आमदार नंदकुमार झावरे पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर, राजकीय चर्चांना उधाण!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पारनेरच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेत निलेश लंके यांना आमदार करण्यासह त्यांना...

अहिल्यानगर हादरले! भाड्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळली तरुणी, जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचे भयंकर कृत्य

अहिल्यानगर । नगर सहयाद्री शहरातील सावेडी उपनगरातील भिस्तबाग परिसरात एका भाड्याच्या खोलीत महाविद्यालयीन युवतीवर...

दिवाळीनंतर आचारसंहिता! महायुतीच्या ‘बड्या’ नेत्याने सांगितला निवडणूक आयोगाचा प्लॅन

मुंबई । नगर सहयाद्री:- लोकसभा, विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद,...

शहरातील रस्ते घोटाळा प्रकरण पुन्हा तापले; किरण काळे यांची उच्च न्यायालयात धाव, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत नागरिकांचा सहभाग

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कामे अर्धवट अवस्थेत...