spot_img
अहमदनगरगाव हादरलं! प्रेमीयुगुल वीज टॉवरला लटकलं..; कुठे घडला 'तसला' प्रकार..

गाव हादरलं! प्रेमीयुगुल वीज टॉवरला लटकलं..; कुठे घडला ‘तसला’ प्रकार..

spot_img

Couple Suicide: एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहित रमेश लिंगायत (वय २५, रा. उचली) आणि एका १४ वर्षीय मुलीने रविवारी आपले जीवन संपवले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली शिवारात सदरचा प्रकार घडला.

उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सदर मुलगी भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहत होती आणि नववीत शिकत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी ती वसतिगृहातून घरी आली होती. २६ फेब्रुवारीला सकाळी रोहित दुचाकीवरून तिच्या घरासमोर आला.

त्याने तिला घराबाहेर बोलावून दुचाकीवर बसवले आणि तिला घेऊन पळून गेला. तिचे वडील मजुरीला गेले होते, तर आई घरकामात व्यस्त होती. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद होता. त्यामुळे त्यांनी ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, उचली शिवारातील वीज टॉवरला गळफास लावलेल्या अवस्थेत एका अज्ञात युवक-युवतीने आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून या दोघांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...