spot_img
अहमदनगरगाव हादरलं! दाजीने मेहुणीवर डाव साधला; जे केलं ते कहरच..

गाव हादरलं! दाजीने मेहुणीवर डाव साधला; जे केलं ते कहरच..

spot_img

Crime News: २१ वर्षीय मेहुणीवर दाजीने अत्याचार केला. नंतर त्याच्याच दोन मित्रांनी अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जाळण्यात आला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, २ आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबाने २३ जानेवारी रोजी तिच्या बेपत्ता होण्याबाबत एफआयआर दाखल केला होता. तपासात आशिषचे मुलीशी अवैध संबंध होते ही बाब उघडकीस आली. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, आशिषने शुभम आणि दीपक यांच्यामदतीने मुलीला फसवले आणि नंतर तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने मुलीचा गळा दाबून हत्या केली.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपीने मुलीचा मृतदेह जाळून टाकला. तपासाच्या आधारे, आशिषला अटक करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीराचे जळालेले अवशेष सापडले आहेत आणि ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित खुन प्रकरणातील आरोपींना जन्मठेप!

राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- श्रीरामपूर येथे अडीच वर्षांपूव...

‘माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर मनपा पहिल्या स्थानावर’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत दुसऱ्या तिमाहीमध्ये (ऑक्टोबर ते डिसेंबर...

आयेशा हुसेन नगरच्या हप्तेखोरीत देखील अव्वल!

नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेल्या नगरच्या आरटेीओ कार्यालयातील आयेशा हुसेन यांनी ‌‘वसुली‌’ टोळी सुरू केल्याचा...

शिरूर-पुणे रस्त्याशी तुमचा संबंध काय? राहुल पाटील शिंदे यांनी खा. लंके यांच्यावर डागली तोफ

पारनेर | नगर सह्याद्री:- ज्या जनतेने निवडून दिले, त्यांना वाऱ्यावर सोडले! ज्या कामाशी तुमचा संबंध...