spot_img
अहमदनगरगाव हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह; भर दुपारी नगरमध्ये भयंकर घटना..

गाव हादरलं! रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह; भर दुपारी नगरमध्ये भयंकर घटना..

spot_img

Crime News : पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील कराळे वस्तीवर एका महिलेचा खून करण्यात आला. लताबाई नानाभाऊ कराळे (वय 50, रा. पिंपळगाव माळवी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून हा खून करण्यात आला असावा. मात्र खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

गुरूवारी दुपारी 12 ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी लताबाई घरी एकट्याच होत्या. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव माळवी शिवारातील वस्तीवर नानाभाऊ कराळे यांचे कुटुंब राहते. नानाभाऊ कराळे व त्यांचा मुलगा कामानिमित्त गुरूवारी दुपारी बाहेर गेले होते. त्यावेळी लताबाई कराळे या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास नानाभाऊ व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर लताबाई या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता.

त्यांनी आरडोआरडा केल्यानंतर वस्तीवर लोक जमा झाले. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली. पोलीस पाटलांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, सहायक निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी होते.

दरम्यान, भरदुपारी हा खून करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून लुटीच्या उद्देशाने करण्यात आला असण्याची शक्यता आहे. मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहा लाख चौरसफुट ओपनस्पेसचा १०० कोटींचा घोटाळा!

मनपाच्या आकृतीबंधात नगर रचनाकार हे पदच नाही, तरीही त्याला दिले सहायक संचालकांचे अधिकार |...

आ. संग्राम जगताप यांचा जैन मंदिर ट्रस्टचा भूखंड हडप करण्याचा डाव; थाटले कार्यालय, ठाकरे सेनेचा काय आहे आरोप पहा

पुणे / नगर सह्याद्री - पुण्यातील जैन हॉस्टेल भूखंड प्रकरणातून उडालेला धुरळा खाली बसत नाही...

पीएम किसान योजना; ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाहीत पैसे, काय कारण पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - PM Kisan Yojana : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएम किसान...

उमेदवारीसाठी इच्छुक राष्ट्रवादीच्या दारी; कोणी कोणी दिल्या मुलाखती…

२०० जणांनी दिले अर्ज; भाजप-राष्ट्रवादी युतीच्या संकेतांनंतर हालचाली वेगवान अहिल्यानगर | नगर सह्याद्री आगामी महापालिका निवडणुकीसाठी...