spot_img
लाईफस्टाईलनागापेक्षाही 15 पटीने जहाल असते 'या' सापाचे विष ! वाचा थक्क करणारी...

नागापेक्षाही 15 पटीने जहाल असते ‘या’ सापाचे विष ! वाचा थक्क करणारी सापाची माहिती

spot_img

नगर सहयाद्री टीम : साप हा प्राणी माहित नसेल असा कुणी शोधून सापडणार नाही. साप म्हटलं तरी अनेकांची तंतरते. जगाच्या पाठीवर अनेक सापांच्या प्रजाती असून त्यातील बहुसंख्य या बिनविषारी आहेत तर काही बोटावर मोजण्याइतक्या विषारी आहेत. प्रत्येक सापाच्या प्रजातीचे त्यांचे त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये असतात. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मानवी वस्तीत आढळून येणारे चार प्रमुख विषारी सापांचा विचार केला तर यामध्ये फुरसे, नाग, घोणस आणि मण्यार या जातींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

भारतात सर्वाधिक मृत्यू प्रामुख्याने सर्पदंशामुळे होतात. सर्पदंशावर एकमेव उपाय म्हणजे सापाचे प्रतिविष. याशिवाय सर्पदंशावर दुसरा कोणताही उपाय नाही. यामध्ये मन्यारच्या सापाच्या प्रजातींचा विचार केल्यास भारतात आढळणाऱ्या प्रमुख विषारी सापाच्या प्रजातींपैकी ही एक प्रमुख विषारी सापाची प्रजाती आहे.

* मण्यारचे विष नागाच्या विषापेक्षा पंधरा पट जहाल
या प्रजातीचा साप निळसर काळ्या रंगाचा असून त्यावर पांढरे आडवे पट्टे असतात. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगामुळे आणि त्याच्या अंगावरील पट्ट्यांमुळे तो पटकन ओळखता येतो. मन्यार प्रजातीच्या सापाचे डोके त्रिकोणी असून तो अंडी घालणारा साप आहे.

या जातीच्या सापाच्या पिल्लांची लांबी 25 सेंटिमीटर तर पूर्ण वाढ झालेल्या मन्यार जातीच्या सापाची लांबी एक ते सव्वा मीटर पर्यंत असते. या जातीच्या सापाचे विष नागाच्या विषापेक्षा अनेक पटींनी अधिक जहाल व तीव्र असते. जर व्यक्तीला मण्यार जातीचा सापाने चावा घेतला तर या जातीच्या सापाच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर पटकन होतो. त्यामुळे व्यक्तीचे मेंदूचे कार्य अनियंत्रित होते व श्वास घ्यायला अडथळे येतात.

पोटात दुखायला लागते, घसा कोरडा पडतो व चावा घेतलेला व्यक्ती किंवा प्राणी बेशुद्ध पडतो अशा प्रकारचे लक्षणे दिसतात. जर या जातीच्या सापाने चावा घेतला व लवकर उपचार मिळाले नाही तर व्यक्ती किंवा प्राण्याचा मृत्यू होतो. मण्यार जातीचा साप हा निशाचर असून रात्रीच्या वेळेला तो त्याच्या भक्षाच्या शोधासाठी बाहेर पडतो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अण्णासाहेब पाटील महामंडळात बोगस लाभार्थी; असे आले उघडकीस…

​बनावट कागदपत्रांद्वारे शासनाचा व्याज परतावा लाटला; दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मराठा...

बिहार तो झांकी है, अहिल्यानगर अभी बाकी है!

मिलिंद गंधे / शहर भाजपच्या वतीने बिहारच्या निवडणूक विजयाचा जल्लोष अहिल्यानगर / नगर सह्याद्री - बिहार...

बिहारमध्ये NDA ला यश, महाराष्ट्रात जल्लोष, पेढे वाटले, ढोल वाजले

मुंबई / नगर सह्याद्री - बिहार विधानसभा निवडणूक २०२५चा आज (१४ नोव्हेंबर) निकाल जाहीर...

बिबट्यांचे हल्ले; पालकमंत्री विखेंनी घेतली मोठी भूमिका

बिबट्यांच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा नियोजनातून ८ कोटी १३ लाखांचा निधी – पालकमंत्री डॉ....