spot_img
अहमदनगरसिगारेटची बॅग पळवणारे दोघे अडकले जाळ्यात! 'असा' लावला सापळा

सिगारेटची बॅग पळवणारे दोघे अडकले जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

spot_img

अहमदनगर| नगर सहयाद्री 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिगारेट बॅगची चोरी करणार्‍या दोघांना पुण्यामधून गजाआड केले आहे. आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपुत, रोहित मदन कुर्मी दोघे ( रा. विद्यानगर झोपडपट्टी मस्जिदजवळ, पिंपरी पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता सदरचा गुन्हा त्यांनी विशाल उर्फ बारक्या अनिल नलवडे, रोहित छोटु भोसले दोघे ( रा. रामनगर, पिंपरी चिंचवड पुणे ) यांचे सोबत केल्याची कबुली दिली आहे.

अधिक माहिती अशी: गोडफ्रे फिलीप्स इंडिया लिमिटेल कंपनीचे सेल्समन मिराज मुमताज शेख (रा. मुकुंदनगर, अहमदनगर ) यांनी दि. २२ एप्रिल रोजी सिगारेटची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असल्याची फिर्याद सुपा पोलीस ठाण्यात दिली होती. सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

पथकाने घटनाठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता पथकास चार इसम सिगारेटचे बॉक्स असलेली बॅग पुण्याच्या दिशेने पळवतांना दिसले. दरम्यान सदर फुटेजमधील इसमांची माहिती घेत असतांना फुटेजमधील एक इसम हा आकाश भवरसिंह असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने दिनांक २७ एप्रिल रोजी पुण्यातुन दोघांना ताब्यात घेत त्याच्याकडून ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि/तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, अमृत आढाव, सागर ससाणे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...