अळकुटीत आणखी एका बँकेची गरज; माजी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांची मागणी
निघोज | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी अळकुटी येथे आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेची गरज असल्याची मागणी माजी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांनी केली आहे.
अळकुटी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे. मात्र परिसरातील वाड्या वस्त्या तसेच गावातील ग्रामस्थ या शाखेचे खातेदार मोठ्या संख्येने आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना गरजू महिलांसाठी सुरु केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. तालुयातील साठ हजार महिला या योजनेमध्ये सहभागी झाल्या असून या मधील सहभागी झालेल्या बहुतांश महिलांना शुक्रवार दि. १६ पासून खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
पोस्ट कार्यालयात आधार कार्ड लिंक करुण केवायसी प्रक्रिया गतीमान असल्याने पोस्टामधील महिला खातेदारांच्या नावावर हे पैसे लवकर जमा झाले आहेत. मात्र अळकुटीमध्ये ठिकाणी सेंट्रल बँकेची एक शाखा आहे. त्या ठिकाणी केवायसी करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. एक दिवसात जवळपास हजारो महिला रांगेत उभ्या होत्या. आधार कार्ड लिंक करण्यासाठी महिलांचा पुर्ण दिवस वाया जातो. तसेच दोन चार दिवस हेलपाटे मारावे लागतात. पर्यायाने रोजंदारीवर जाणार्या महिलांचा रोज बुडतो म्हणजे आर्थिक नुकसान होते. यासाठी अळकुटी येथे आणखीन एका राष्ट्रीयकृत बँकेची गरज आहे अशी मागणी उपसरपंच अरिफ पटेल व ग्रामस्थांनी केली आहे.