संगमनेर / नगर सह्याद्री –
इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामुळे कायमच चर्चेत असतात. मात्र, मुलीचा साखरपुडा ज्याप्रकारे त्यांनी केला, त्यानंतर त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडाली. इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा अत्यंत शाही थाटात साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये झाला. या साखरपुड्याची काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला. आपल्या र्कीतनात महाराज कायमच लग्नात ज्याप्रकारे पैसे उडवले जातात, त्यावर भाष्य करताना दिसले. हेच नाही तर पोरी लग्नात कशा नाचतात, त्यावरही महाराज अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना दिसले. आता तसेच त्यांच्या मुलीला साखरपुड्यात डान्स करताना लोकांनी बघितले आणि थेट डोक्याला हात लावली. लोका सांगे ब्रह्यज्ञान स्वत: कोरडे पाषाण म्हणण्याची वेळ आली. लग्न साध्या पद्धतीने केले तरीही लेकरं होतात, असेही इंदुरीकर महाराजांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते.
लेकीच्या लग्नात इंदुरीकर महाराजांनी तूफान पैसा उडवला. प्रत्येक गोष्ट आलिशान होती. ज्ञानेश्वरी भल्या मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन कार्यालयात पोहोचली होती. डोळ्यावर गॉगल आणि खास स्टाईल इंदुरीकर महाराजांच्या लेकीची बघायला मिळाली. महाराजांनी लेकीचा साखरपुडा इतका थाटात केल्याने सध्या ते टीकेचे धनी ठरले असून त्यांच्यावर प्रत्येक स्तरातून टीका केली जात असतानाच र्कीतन थांबवण्याचे त्यांनी होणाऱ्या टीकेनंतर संकेत दिली.
सध्या सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांची लेक ज्ञानेश्वरी आणि होणारा जावई साहिल चिलप यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. इंदुरीकर महाराजांच्या जावयानेच थेट सांगितले की, त्यांच्या खासरपुड्याला नेमकी किती लोक उपस्थित होते. लोकांना लग्न साधे आणि कमी लोकांमध्ये करा, असे उपदेश देणाऱ्या महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात मात्र, तब्बल साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. हे स्वत: इंदुरीकर महाराजांचे जावई सांगत आहेत.
व्हिडीओमध्ये महाराजांचे जावई साहिल चिलप आणि ज्ञानेश्वरी दोघेही दिसत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला ज्ञानेश्वरी आणि साहिल सर्वांना हात जोडून नमस्कार करताना दिसत आहे साहिल म्हणतो की, नमस्कार आमचा साखरपुडा संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये थाटामाटात पार पडलाय. किमीत कमी तीन ते साडेतीन हजार लोकांचे चांगल्यापद्धतीने नियोजन झाले आहे. आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाहीये. सगळा कार्यक्रम सुंदरपणे पार पडलेला आहे. आमची जी एंट्री झाली ती सुंदर होती. साखरपुड्याला किती लोक होते, हे आता महाराजांच्या जावयानेच स्पष्ट बोलू दाखवले आहे.



