spot_img
ब्रेकिंगवाघांने हल्ला करत महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडला; कुठे घडला भयंकर प्रकार?

वाघांने हल्ला करत महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडला; कुठे घडला भयंकर प्रकार?

spot_img

Maharashtra News: वाघानं हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात नागरिक संतप्त झाले होते. यामुळे परिसरात हिंसक वळण आले होते. यावेळी नागरिकांनी वनविभागाच्या गाड्यांची तोडफोड करत वाहन पेटवून दिली. नंदा किसन खंडाते (वय ५०) असे मृत शेतकरी महिलेचे नाव आहे

दरम्यान वाघाने हल्ला करत ठार केल्यानंतर वाघाने यांच्या मृतदेहाजवळ ठाण मांडला होता. ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघ तेथून गेला नाही. अखेर वाघांने महिलेच्या मृतदेहाजवळचं ठिय्या मांडल्यानं याची माहिती वनाधिकारी आणि पोलीस विभागाला दिली.

मात्र, वन विभागाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला. करीत शेकडोंच्या संख्येतील संतप्त ग्रामवासीयांनी घटनास्थळावर पोहोचलेल्या १० ते १५ वन कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा रोष बघता वन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवत सैरावरा पळाले. यानंतर या प्रकरणाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिलं.

रात्री उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध करून त्याला जेरबंद केलं. मयत महिलेच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी या मागणीला घेऊन आंदोलन देखील करण्यात आले. सदरची घटना भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा येथे घडली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...